आरुषी व हेमराज हत्या प्रकरणी तलवार दाम्पत्यांची निर्दोष मुक्तता

- Advertisement -

उत्तर प्रदेश– संपूर्ण देशभरात गाजलेल्या आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपी राजेश व नुपूर तलवार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने २६  नोव्हेंबर २०१३ रोजी आरुषीचे आई-वडील राजेश आणि नुपूर तलावर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात राजेश आणि नुपूर तलवार यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आज सुनावणी झाली असता, न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

- Advertisement -