‘काँग्रेस’ अध्यक्षपदावरुन अय्यर यांचा घराणेशाहीवर हल्ला

- Advertisement -

‘काँग्रेस पक्षात फक्त दोनच व्यक्ती अध्यक्ष बनू शकतात. आई किंवा मुलगा. राहुल गांधी यांनी आधीच तशी तयारी दाखवली आहे,’ अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी स्वपक्षातील घराणेशाहीवर हल्ला चढवला आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना अय्यर यांनी ही तिरकस प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे ऑक्टोबर अखेरपर्यंत पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील, अशी चर्चा आहे. राहुल हेच अध्यक्ष व्हावेत, अशी पक्षाची भावना असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे. मात्र, अन्य कुणी निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवल्यास निवडणुकीची घोषणा केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -
- Advertisement -