नवज्योत सिंग सिध्दू यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

- Advertisement -

माजी क्रिकेटर आणि पंजाबचे पर्यटनमंत्री नवज्योतसिंग सिध्दू यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमधील त्यांच्या सहभागावर रोख लावणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिकाच आधारहिन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

अॅड. हरिचंद अरोरा यांनी सिध्दू विरोधात याचिका दाखल केली होता. सिध्दू हे पंजाबचे पर्यटनमंत्री आहेत आणि मंत्री असताना ते कॉमेडी शो किंवा कोणत्या जाहिरातीमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. सिध्दू यांनी कपिलच्या शोमधून बाहेर पडावे किंवा मंत्रीपद सोडावे अशी मागणी याचिकेद्वारे केली होती.

- Advertisement -

सप्टेंबरमध्येच ‘द कपिल शर्मा शो’ बंद झाला होता आणि आता शो बंद झाल्यानंतर याचिकेला काही अर्थ राहत नाही असे म्हणत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ती फेटाळली.

- Advertisement -