पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसासाठी फिलिपाईन्स दौऱ्यासाठी रवाना

- Advertisement -

महत्वाचे…
१. तीन दिवसासाठी फिलिपाईन्स दौरा २. आशियानच्या ५० व्या वर्धापनदिनानिम्मित रोडीनो यांच्यातर्फे विशेष उत्सवाचे आयोजन ३ पंतप्रधान नरेंद्र मोदींची १४ नोव्हेंबरला मनिला येथे पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थिती

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसासाठी फिलिपाईन्स दौऱ्यावर रविवारी सकाळी रवाना झाले. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ वी दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना भारत शिखर परिषद आणि १४ नोव्हेंबरला मनिला येथे होणाऱ्या पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदी फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुट्रेटे यांचीही भेट घेणार आहेत. रॉड्रिगो दुट्रेटे हे दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्येही मोदी सहभागी होणार आहेत. आशियाई देशांशी भारताचे व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध वाढविण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी मोदी मनिला येथील प्रादेशिक व्यापक आर्थिक सहभागाच्या बैठकीत भाग घेणार आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -