पंतप्रधान नेतन्याहू यांनी पत्नीसह चालवला चरखा; पतंगही उडवला

- Advertisement -

गुजरात: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत इस्राईलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा नेतन्याहू देखील गुजरातमध्ये दाखल झाल्या आहेत. या दोघांचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अहमदाबाद एअरपोर्टवर स्वागत करण्यात आलं आहे. आज एअरपोर्ट ते साबरमती दरम्यान मोदींचा रोड शो होता.

या वेळी इस्राईलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू मोदींसोबत रोड शोमध्ये राहणार उपस्थित राहिले. मोदींच्या या रोड शोला सुरुवात झाली आहे. आणि सध्या ते साबरमती आश्रमात पोहचले आहेत. यात त्यांनी महात्मा गांधींनी श्रद्धांजली दिली. त्याचबरोबर नेतन्याहू यांनी साबरमती आश्रमात चरखाही चालवला आहे. आश्रमातल्या सगळ्या वस्तूंची ओळख करुन देताना मोदी दिसत आहेत. त्याचबरोबर या दोन्ही पंतप्रधानांनी पंतग देखील उडवला. या कार्यक्रमात गुजरातच्या सांस्कृतीय गाण्यांची मैफलही सादर करण्याल आली आहे.

८ किलोमीटरचा मोदींचा हा रोड शो होता. या शोसाठी अहमदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. इस्राईलचे सुरक्षरक्षक देखील या शो दरम्यान उपस्थित राहिले. याच दरम्यान साबरमती येथं जाऊन मोदी आणि नेतन्याहू यांच्याकडून महात्मा गांधी यांना श्रद्घांजलीही वाहिली. त्यांतर हे दोन्हीही पंतप्रधान आईस्क्रिट सेंटरला जावून १५०० पेक्षा जास्त उद्योग क्षेत्रातील सगळ्या मोठ्या मंडळींसोबत लंच करणार आहेत.

- Advertisement -

मोदींच्या या रोड शोसाठी अहमदाबादमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. अनेक सांस्कृतीत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. काही दिवसांपासून इस्राईलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा नेतन्याहू या भारत दौऱ्यावर आहेत.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here