Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशपद्मावत गलिच्छ चित्रपट; बघू नका: ओवेसी

पद्मावत गलिच्छ चित्रपट; बघू नका: ओवेसी

हैदराबाद: संजय लीला भन्साळींच्या पद्मावतला सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवला असला तरी विविध संघटनांकडून त्याला विरोध सुरूच आहे. पद्मावतच्या विरोधकांमध्ये आता एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची भर पडली आहे. पद्मावत हा एक गलिच्छ व अपशकुनी चित्रपट आहे. मुसलमानांनी तो पाहू नये,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.
वारंगल येथे एका सभेला संबोधित करताना ओवेसी यांनी हे आवाहन केलं. पद्मावत हा एक फालतू चित्रपट आहे. हा चित्रपट पाहणं म्हणजे वेळ आणि पैशाची नासाडी आहे. त्यामुळं मुसलमानांनी, खासकरून तरुणांनी हा चित्रपट बघू नये.

देवानं तुम्हाला हा दोन तासांचा चित्रपट पाहण्यासाठी बनवलेलं नाही. एक चांगलं जीवन जगण्यासाठी तुमचा जन्म आहे. अनेक पिढ्या आठवण काढतील, अशी कामं करण्यासाठी तुमचा जन्म झालाय,’ असंही ओवेसी म्हणाले.  या निमित्तानं ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. ‘मलिक मोहम्मद जायसी नावाच्या एका कवीनं १५४०मध्ये ही कथा लिहिली होती. या कथेला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही. तरीही सरकार यात नको इतका रस घेतेय. या बकवास चित्रपटाची समीक्षा करण्यासाठी मोदी सरकारनं १२ सदस्यीय समितीची स्थापना केली. पण तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर मुस्लिम नेत्यांशी साधा संवाद साधायची त्यांना गरज वाटली नाही,’ असा हल्ला ओवेसी यांनी चढवला.

मुस्लिमांनी राजपूतांकडून शिकावं!

‘आपल्या राणीच्या सन्मानासाठी संघर्ष करणाऱ्या राजपूतांकडून मुस्लिमांनी शिकलं पाहिजे. ‘पद्मावत’ प्रदर्शित होऊ नये म्हणून ते एकजुटीनं उतरले आहेत. त्यांची एकजूट हा आपल्यासाठी धडा आहे. कारण, मुस्लिम दुभंगलेले आहेत. इस्लामिक कायद्यात बदल होत असताना ते साधा आवाजही उठवत नाहीत,’ असं ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments