‘पद्मावत’ विरोधात अहमदाबादेत हिंसा; ४० गाड्यांना आग,

- Advertisement -

नवी दिल्ली – संजय लीला भंसाळीचा चित्रपट पद्मावतचा विरोध अजूनही चालू आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये काही बंडखोरांनी एका मॉलला निशाणा बनवत तिथे उभ्या असलेल्या ४० गाड्यांना आग लावली. या हिंसेला थांबविण्यासाठी पोलिसांनी त्याठिकाणी हवेत गोळीबार केला. सिनेमा हॉलच्या व्यवस्थापकाने पद्मावत चित्रपट नाही लावणार असे सांगूनही हिमालय मॉलच्या बिग सिनेमाची तोडफोड करण्यात आली.

पद्मावत चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच गुरुग्राममध्ये कलम १४४ लागू केली आहे. करणी सेनाने चित्रपटाची स्क्रिनिंग करण्याऱ्या सिनेमागृहांना निशाणा बनवत धमकी दिली आहे. गुरुग्राममध्ये ४० हून अधिक सिनेमागृहे आणि मल्टीप्लेक्स आहेत.

- Advertisement -