होम देश मल्लिका शेरावत आणि तिच्या बॉयफ्रेंडला न्यायालयाचा झटका!

मल्लिका शेरावत आणि तिच्या बॉयफ्रेंडला न्यायालयाचा झटका!

10
0
शेयर

पेरिस: काही दिवसांपासून मल्लिका शेरावत बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर आहे. काही वर्षांपूर्वी ती भारतातून फ्रांसला शिफ्ट झाली आहे. मात्र सध्या ती एक वेगळ्या अडचणीत सापडली आहे. कोर्टाने तिला भाड्याचे घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. मल्लिकावर घर मालकाचे  ८० हजार युरो म्हणजे सुमारे ६४ लाख रुपए भाडे थकीत आहे. घराचे भाडे न दिल्याने कोर्टाने घरातून बाहेर पडायले आणि सगळे फर्निचर जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

मल्लिका शेरावर पेरिसमधल्या एका पॉश परिसरात रहाते.  तिचा फ्रेंच बॉयफ्रेन्ड साइरिल ऑक्जेनफेन्स सोबत ती तिकडे राहते.  गतवर्षी १४ डिसेंबरला कोर्टाने दोघांना घर भाडे चुकते करण्याचे आदेश दिले होते.  घर मालकाचे म्हणणे आहे कि मल्लिकाने मला फक्त एकदाच २७१५ यूरोचे भाडे दिले होते. त्यानंतर तिने एकही पैसा दिला नाही. १४ नोव्हेंबर २०१७ ला पेरिस कोर्टात सुनावणी दरम्यान मल्लिकाच्या वकीलाने सांगितले होते की तिची आणि तिच्या बॉयफ्रेंडची आर्थिक परिस्थिती ठिक नाही. वकिलाने पुढे हेही सांगितले होते सध्या मल्लिकाला काम मिळत नाही आहे त्यामुळे तिला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मात्र घर मालकाने हे आरोप फेटाळून लावले तो म्हणाला मल्लिकाने त्याच्या घरात राहत असताना लाखो डॉलरची कमाई केली आहे. ती खोट बोलते आहे.
कोर्टाच्या निर्णयामुळे ३१ मार्च २०१८ पर्यंत मल्लिकाला सुट मिळाली आहे. फ्रांसमधल्या नियमानुसार जास्त थंडी असल्यामुळे ३१ मार्चपर्यंत तिला घराबाहेर काढू शकत नाही. त्यामुळे तिला जर त्याआधी घराबाहेर काढले तर ते नियमांच्या बाहेर आहे. मल्लिका शेरावत दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर्टी पॉलिटीक्स’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. यानंतर २०१६ मध्ये ‘टाइम राइडर्स’ या चीनी चित्रपटात ती झळकली होती. ‘मर्डर गर्ल’ नावाने प्रसिद्ध झालेली मल्लिका ‘मर्डर’,‘किस किस की किस्मत’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’,‘गुरू’,‘हिस्स’ अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत दिसलेली आहे. ‘द मिथ’ या विदेशी चित्रपटात जॅकी चॅनसोबत तिने काम केले.