सॅनिटरी नॅपकीवरील जीएसटीचा वाद आता

- Advertisement -

नवी दिल्ली | केंद्र सरकारने सॅनिटरी नॅपकिनवर १२ टक्के जीएसटी लागू केल्याने नाराजी व्यक्त होत असतानाच आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक बाजू सुप्रीम कोर्टाने ऐकण्याची गरज आहे का याचा आढावा घेण्यात येईल आणि तसे संबंधित याचिकाकर्त्यांना कळवण्यात येईल असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे. कोर्टाने या प्रकरणातील सर्व याचिकाकर्त्यांना नोटीस बजावली आहे.

सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटीविरोधात मुंबई हायकोर्ट आणि देशातील अन्य न्यायालयांमध्ये याचिका दाखल झाल्या आहेत. सुप्रीम कोर्टातही याबाबत याचिका दाखल झाली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने देशाच्या विविध न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीला स्थगिती देत या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक बाजू सुप्रीम कोर्टाने ऐकण्याची गरज आहे का याचा आढावा घेण्यात येईल, असे कोर्टाने सांगितले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील  खंडपीठासमोर सुनावणी झाली होती.

दरम्यान, गेल्या आठवड्यात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. ‘सॅनिटरी नॅपकिन’ वापरणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. असे असताना त्यावर १२ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावण्यात आल्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ‘शेट्टी वुमेन वेल्फेअर’ या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने जनहित याचिका करण्यात आली होती. ‘सॅनिटरी नॅपकिन’च्या किमती कमी करण्याचा विचार करण्याची सूचनाही न्यायालयाने सरकारला केली होती.

- Advertisement -
- Advertisement -