७ लाख ५८ हजार प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ

- Advertisement -

नवी दिल्ली – जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करुन देशभरातील प्राध्यापकांना केंद्रानं दिवाळी भेट दिली आहे. सातव्या वेतन आयोगाचा ७  लाख ५८ हजार प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.

आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, प्राध्यापकांना सातवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीने केंद्राच्या तिजोरीवर २२ हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

- Advertisement -