Thursday, March 28, 2024
Homeदेशअमेठीतल्या पोस्टर्सवर राहुल गांधी राम, नरेंद्र मोदी रावण

अमेठीतल्या पोस्टर्सवर राहुल गांधी राम, नरेंद्र मोदी रावण

अमेठी – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोमवारपासून दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांचा अमेठीचा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते उत्सुक आहेत.

राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे पोस्टर्सही भिंतीवर लागली आहेत. या पोस्टर्सवर राहुल गांधी भगवान राम यांच्या रूपात दिसतात, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी रावणाच्या रुपात दिसत आहेत.
पोस्टरवर लिहिले आहे की, २०१९ मध्ये राहुलच्या रूपाने, भगवान रामाचा अवतार घेतील आणि राहुल राज (रामराज) येईल. गौरीगंजचे युवा नेते अभय शुक्ला यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. पोस्टरमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर बाणाने निशाणा साधत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments