Thursday, March 28, 2024
Homeदेशआता शौचालयांनाही मिळणार 'आधार'सारखा क्रमांक!

आता शौचालयांनाही मिळणार ‘आधार’सारखा क्रमांक!

नवी दिल्ली – आता शौचालयांनाही ‘आधार’ प्रमाणे विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालयांची देखभाल अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

हा ओळख क्रमांक सार्वजनिक शौचालयांच्या बाहेर पाटीवर लावण्यात येणार आहे. शौचालयाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव, शौचालयावर काम करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि शौचालयासंबंधी तक्रार करण्यासाठी या विभागातील सुपरवाईजरचा फोन नंबर या पाटीवर असणार आहे. शौचालय अस्वच्छ अढळल्यास नागरिकांना आता ओळख क्रमांकाचा वापर करत तक्रार करता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments