Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशआपली राष्ट्रीय तपास यंत्रणा करते तरी काय, ओवेसींचा सवाल

आपली राष्ट्रीय तपास यंत्रणा करते तरी काय, ओवेसींचा सवाल

हैदराबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये गुजरात निडणुकांमध्ये पाकिस्तानचा हस्तक्षेप असल्याचे वक्तव्य केले होते. मोदींच्या वक्तव्याचा एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला आहे. पाकिस्तानचा गुजरात निवडणुकांत हस्तक्षेत असल्याची खात्री पंतप्रधानांना असेल, तर त्यांनी चौकशी करण्याचे आदेश द्यावे आणि या प्रकरणातील दोषींना अटक करावे, असे ओवेसी म्हणाले.

गुजरात निवडणुकांमध्ये पाकिस्तानचा हस्तक्षेप, या पंतप्रधानांच्या विधानामध्ये तथ्य असेल तर भारतातील एनआयए ही गुप्तचर संघटना काय करते आहे? जे या प्रकरणामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई का करत नाही? असा सवाल ओवेसींनी केला. तसेच पंतप्रधानांकडून अशा सौम्य प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती, त्यांनी दोषींना अटक करून दाखवायला हवी, असा टोला ओवेसींनी लगावला.
एमआयएमच्या नेत्याने म्हटले, की पंतप्रधान निवृत्त लष्करप्रमुख आणि माजी परराष्ट्र सचिव यांचे राष्ट्रीयत्व आणि निष्ठा यावरही प्रश्न विचारत आहेत. जर हे योग्य असेल तर याबाबत त्यांनी देशातील जनतेला सांगावे, कारण ही एक गंभीर बाब आहे. येवढ्या गंभीर प्रकरणाची मोदींनी दखल घेतली नाही. गुजरातमध्ये फक्त मते मिळवण्यासाठी हे वक्तव्य पंतप्रधानांनी केले असल्याचा आरोप ओवेसींनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments