Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशआरएसएस, बजरंग दल दहशतवादाचा एक प्रकार - सिद्धरामय्या

आरएसएस, बजरंग दल दहशतवादाचा एक प्रकार – सिद्धरामय्या

बंगळुरू – गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीचा रणसंग्राम संपल्यानंतर कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाक्युध्दाला सुरूवात झाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे सातत्याने भाजपवर टीकास्त्र सोडत आहेत. ते म्हणाले, की एनआयए सातत्याने पीएफआयला निशाणा करत असून त्यांच्या ५ लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकार पीएफआयवर बंदी आणत आहे का ? राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, बजरंग दल हा सुध्दा दहशतवादाचाच एक प्रकार आहे.

सिद्धरामय्या म्हणाले, की कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, मग तो राष्ट्रीय स्वयंसेवक असो, विहिंप असो किंवा बजरंग दल.
सिद्धरामय्यांच्या या टिकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप कर्नाटकने ट्विटर अकाऊंटवर म्हटले की, सिद्धरामय्या हे निवडणुकीसाठी मतांचे ध्रुवीकरण करत आहे. एकीकडे ते भाजप-आरएसएस यांना दहशतवादी संघटनेचा एक प्रकार म्हणत आहेत. तर दुसरीकडे स्थानिक काँग्रेस अध्यक्ष दिनेश भाजपवर बंदी आणावी, अशी मागणी करत आहेत. काँग्रेसने समजून घेतले पाहिजे, की हे १९७५ साल नाही आणि आज इंदिरा गांधी पंतप्रधान नाहीत, असा चिमटाही भाजपने काँग्रेसला काढला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments