Friday, March 29, 2024
Homeदेश'आसारामवर कारवाई नाही, मग झाकिर नाईकवर का?'

‘आसारामवर कारवाई नाही, मग झाकिर नाईकवर का?’

महत्वाचे…
१.न्या. मनमोहन सिंग यांनी नाईकची सील केलेली संपत्ती ईडीच्या ताब्यात देण्यास नकार दिला
२.१० वर्षे शारीरिक शोषणाचा आरोप असलेल्या आसाराम बाबाची संपत्ती जप्त करण्याची ईडीने कारवाई का केली नाही ३. आरोपपत्रातच अपराध निश्चित करण्यात आलेले नाही. मग, संपत्ती जप्त करण्यासाठी काय आधार


नवी दिल्ली – वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा प्रमुख झाकीर नाईक प्रकरणी ईडीला न्यायिक लवादाने फटकारले आहे. न्या. मनमोहन सिंग यांनी नाईकची सील केलेली संपत्ती ईडीच्या ताब्यात देण्यास नकार दिला आहे. १० हजार कोटींहून अधिक संपत्ती असलेले अनेक बाबा आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचेही सिंग यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

असे अनेक बाबा आहेत ज्यांची संपत्ती १० हजार कोटीहून अधिक आहे. त्यांच्याविरोधात खटले सुरू आहेत. अशा बाबांच्या विरोधात कारवाई केली का? असा सवाल न्या. मनमोहन सिंग यांनी ईडीच्या वकिलांना केला. १० वर्षे शारीरिक शोषणाचा आरोप असलेल्या आसारामची बाबाची संपत्ती जप्त करण्याची ईडीने कारवाई का केली नाही, मात्र नाईक प्रकरणात शिघ्र गतीने काम सुरू आहे, असे लवादाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. आरोपपत्रातच अपराध निश्चित करण्यात आलेले नाही. मग, संपत्ती जप्त करण्यासाठी काय आधार आहे, असे ईडीच्या वकिलांना विचारण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments