Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeदेशउत्तर प्रदेशमधील 'योगी'राजमध्ये हज हाऊसचेही भगवेकरण!

उत्तर प्रदेशमधील ‘योगी’राजमध्ये हज हाऊसचेही भगवेकरण!

लखनऊ – उत्तर प्रदेशमधील योगीराजमध्ये भगवीकरणाचा जोर वाढतच असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी लखनौ येथे हज हाऊसच्या सभागृहाच्या बाहेरील भिंती भगव्या रंगाने रंगवण्यात आल्या आहेत. भगवा रंग हिंदूत्ववाद्यांकडून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कडून धार्मिक प्रतिक म्हणून वापरला जातो.

या घटनेबाबत बोलताना उत्तर प्रदेशचे मंत्री मोहसिन रझा यांनी सांगितले की, यामुळे कोणत्याही वादाला आमंत्रित केले जात नसून अशा गोष्टींमध्ये वादविवाद करण्याची गरज नाही. भगवा रंग हा एक उर्जा देणारा आणि उठून दिसणारा रंग आहे. त्यामुळे इमारत सुंदर दिसते. विरोधकांकडे आपल्याविरुद्ध कोणताही मोठा मुद्दा नसल्यानेच ते असे मुद्दे उपस्थित करत आहेत. मात्र विरोधकांनी भाजप पुन्हा एकदा राज्याचे ‘भगवीकरण करत असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि लखनौच्या उच्च शासकीय अधिकाऱ्यांची कार्यालये असलेल्या राज्य सचिवालयाच्या इमारतीला देखील भगवा रंग देण्यात आला आहे. आदित्यनाथ यांनी मागील वर्षी अशाच पद्धतीने ५० भगव्या बसेस आणल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments