Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेश'काश्मीरमधील दहशतवादी शहीद, ते आपल्या भावासारखे',- आमदार एजाज अहमद

‘काश्मीरमधील दहशतवादी शहीद, ते आपल्या भावासारखे’,- आमदार एजाज अहमद

श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये एकीकडे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर पुरेपूर प्रयत्न करत असताना, भाजपाच्या सहाय्याने सरकार चालवणा-या पीडीपीच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान करत मुक्ताफलं उधळली आहेत. काश्मीरमधील दहशतवादी शहीद आहेत आणि ते आपल्या भावासारखे आहेत असं वादग्रस्त वक्तव्य पीडीपीचे आमदार एजाज अहमद मीर यांनी केलं आहे. एजाज अहमद मीर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पीडीपीसोबत भाजपा युतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भाजपा आणि पीडीपी सोबतचा घरोबा तोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘काश्मीरमधील दहशतवादी शहीद आहेत आणि ते आपल्या भावासारखे आहेत. त्यांच्यातील काहीजण अल्पवयीन आहेत ज्यांना आपण काय करतोय हेदेखील माहित नाही’, असं एजाज अहमद मीर म्हणाले आहेत. सोबतच दहशतवाद्यांच्या मृत्यूचं आपण सेलिब्रेशन करण्याची गरज नाही. तेदेखील काश्मीरचे रहिवासी आहेत आणि हे आपलं अपयश आहे  असंही ते बोलले आहेत. ‘जेव्हा आपले जवान शहीद होतात तेव्हादेखील आपल्याला दुख: होतं. ज्याप्रमाणे आपण जवानांच्या पालकांची सांत्वना करतो त्याचप्रमाणे दहशतवाद्यांच्याही करायला हवं’, अशी मुक्ताफळे त्यांनी यावेळी उधळली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments