Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशखोटेपणा हीच मोदी सरकारची ओळख: अरूण शौरी

खोटेपणा हीच मोदी सरकारची ओळख: अरूण शौरी

महत्वाचे…
१.व्ही.पी.सिंह आणि नरेंद्र मोदींच्या बाबत आपण चूक केली २. गांधीजी म्हणत की तो (व्यक्ती) काय करत आहे, हे पाहू नका त्याच्या चरित्राकडे पाहा ३. वृत्तपत्रांमध्ये पानभर जाहिराती देऊन फसवणूक करत आहे.


नवी दिल्ली: खोटेपणा ही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची ओळख असून रोजगार निर्मितीसारखी अनेक आश्वासने पूर्ण करण्यात ते अपयशी ठरलेत, अशी टीका प्रसिद्ध पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी केली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या शौरी यांनी लोकांना सरकारच्या कामाचे सूक्ष्मरूपाने मूल्यांकन करण्याचे आवाहन केले.

अरुण शौरी यांनी मोदी सरकारच्या ध्येयधोरणाला पुन्हा एकदा लक्ष्य केले.‘टाइम्स लिट फेस्ट’ मध्ये सहभागी झालेल्या शौरी यांनी सरकारच्या कामकाजाचा बुरखा फाडला. या सरकारची अनेक उदाहरणे देता येतील. वृत्तपत्रांमध्ये पानभर जाहिराती देऊन सरकारने फक्त फक्त मुद्रा योजनेच्या माध्यमातून साडेपाच कोटींहून अधिक रोजगार निर्मिती झाल्याचा दावा केला आहे. पण यामुळे आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. कारण खोटेपणा हीच सरकारची ओळख बनली आहे, असा टोलाही लगावला.

एखादा व्यक्ती किंवा नेता दीर्घ काळापासून काय करत आहे, याचा तपास करण्याची गरज नाही. उलट त्या व्यक्तीच्या कार्यावर सूक्ष्म नजर असली पाहिजे. महात्मा गांधींचे उदाहरण देत ते म्हणाले, गांधीजी म्हणत की तो (व्यक्ती) काय करत आहे, हे पाहू नका. त्याच्या चरित्राकडे पाहा. त्याच्या चरित्रातून आपल्याला काय शिकता येईल, ते पाहा.

आम्ही दोन वेळा व्ही.पी.सिंह आणि नरेंद्र मोदींच्या बाबत चूक केली आहे. या व्यक्ती तेच बोलतात जे त्याक्षणी सुविधाजनक असते. त्याचबरोबर संसदेचे हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी केल्यावरूनही सरकारवर त्यांनी टीका केली. शौरींच्या या टिकेला सरकारकडून कशा प्रकारे उत्तर दिले जाते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments