Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशगुजरातमध्ये सत्ता काँग्रेसचीच ; एक्झीट पोल 'मॅनेज्ड'- अल्पेश ठाकोर

गुजरातमध्ये सत्ता काँग्रेसचीच ; एक्झीट पोल ‘मॅनेज्ड’- अल्पेश ठाकोर

गुजरात: गुजरातमध्ये सध्या भाजपविरोधी वातावरण आहे.त्यामुळे काँग्रेस १०४ ते १०६ जागा जिंकून येईल असं मत ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी व्यक्त केलं आहे.

गुजरातमध्ये १४ डिसेंबरला अंतिम टप्प्यातील मतदान झालं.यानंतर एक्झीट पोल जाहीर करण्यात आले. या एक्झीट पोल्समध्ये गुजरातला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर अल्पेश ठाकोरने यांनी भाजपला एक्झीट पोल इतक्या जागा देतात कशा असा प्रश्न विचारला आहे. तसंच हे एक्झीट पोल मुंबईतील सट्टेबाजांनी मॅनेज केले असल्याची माहितीही आपल्याला मिळाली आहे असंही त्यांनी सांगितलं. तसंच सत्ता जाण्याच्या भीतीनं भाजप ईव्हीएममधे गडबड करण्याची शक्यता आहे असंही तो म्हणाला. या दोन दिवसात भाजप इव्हीएममध्ये गडबड करेल असं हार्दिक पटेलही म्हणाला होता.तसंच राधनपूरच्या लढतीत आपणच जिंकणार असं भाकितही त्याने वर्तवले. गुजरातच्या निवडणुकांचा निकाल १८ डिसेंबरला लागणार आहे. या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments