Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशनवा वाद –ताज महोत्सवामध्ये प्रभू रामचंद्रांवरील संगीत नाटकाचं सादरीकरण

नवा वाद –ताज महोत्सवामध्ये प्रभू रामचंद्रांवरील संगीत नाटकाचं सादरीकरण

आग्रा: आग्रा येथील ताज महोत्सवमध्ये साधारणपणे मुघल संस्कृती प्रतिबिंबित होत असे. मात्र, हा पायंडा आता मोडला जाणार असून पहिल्यांदाच प्रभू रामचंद्रांवर संगीत नाटक ताज महोत्सवात सादर करण्यात येणार आहे. टाइम्स नाउनं दिलेल्या वृत्तानुसार राज्य सरकार अशा कार्यक्रमांचं भगवेकरण करतंय की काय अशा वादाला तोंड फुटलं आहे. फेब्रुवारी १८ ते २७ या कालावधीत हा महोत्सव रंगणार आहे. उद्घाटन समारंभासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राज्यपाल राम नाईक अशा दोघांना आमंत्रित करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टीनं ताज महोत्सवमध्ये प्रभू रामचंद्रांवर बेतलेल्या संगीत नाटकाच्या आयोजनाचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे खुद्द राज्य सरकारनं मात्र आयोजनाच्या बाबतीत आपला काही संबंध नाही असं सांगत चार हात लांब रहाणं पसंत केलं आहे. ताजमहलच्या इतिहासाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं मत राज्य सरकारमधील एका अधिकाऱ्यानं व्यक्त केलं आहे. त्यामुळे ताज महोत्सवच्या संकल्पनेवर टीका करणं चुकीचं असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. ताज महोत्सव हा मुख्यत: मुघल संस्कृतीचं प्रदर्शन करणारा महोत्सव असल्याचा काहींचा दावा आहे आणि आता त्यातं भगवीकरण सुरू असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. तर, हे सगळं ठरवण स्थानिक प्रशासनाचं काम असून यात राज्य सरकारचा काही संबंध नाही असं सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

उत्तर प्रदेश पर्यटन खात्याचे सहसंचालक दिनेश कुमार यांनी सांगितलं की ताज महोत्सव समिती संकल्पना निवडते आणि त्या धर्तीवरील कार्यक्रमाची आखणी करते. यावेळी शहरातील लोकांकडून संकल्पना मागवण्यात आल्या होत्या. जवळपास १८० ते १८५ इतक्या संकल्पना नागरिकांवी सुचवल्या. त्यातून निवड समितीनं धरोहार ही संकल्पना निवडली. यंदाच्या महोत्सवाचं ब्रँडिंग याच संकल्पनेवर आधारीत आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमही याच संकल्पनेवर आधारीत असणार आहेत.

दरम्यान, भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रभू रामचंद्रावरील या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे. या कार्यक्रमामुळे ताज महालचा काही अपमान होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. जो हिंदूंचा डीएनए आहे तोच मुस्लीमांचाही आहे यावर आमचा विश्वास आहे, कारण आम्ही एकाच कुटुंबाचा भाग आहोत असं आम्ही मानतो असं सांगत सुब्रमण्यम स्वामींनी ध्रुवीकरणा कशाला करता असा प्रतिसवालच केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments