Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशपाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संस्थेला भारतीय हवाईदलाची माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्याला अटक

पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संस्थेला भारतीय हवाईदलाची माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्याला अटक

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संस्थेला भारतीय हवाईदलाची माहिती पुरवण्याच्या आरोपावरून ग्रुप कॅप्टन अरुण मारवाहला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त प्रमोद खुशवाह यांनी ही माहिती दिली आहे. त्याच्यावर कार्यालयीन गोपनियता कायद्यांतर्गत कलम ३ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यत आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारवाह हा स्मार्टफोनच्या सहाय्याने हवाई दलाच्या काही मुख्य आणि गोपनीय दस्तऐवजांचे फोटो काढून ते व्हॉट्सअॅपच्या सहाय्याने पाकिस्तानच्या आयएसआय संस्थेला पाठवत होता. संशयावरून हवाईदलाने त्याला ३१ जानेवारीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मारवाहला आयएसआयने डिसेंबर महिन्यात फेसबुकच्या माध्यमातून हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवले.

या फेसबुक प्रोफाईलच्या माध्यमातून आयएसआयने एक मॉडेल म्हणून मारवाहबरोबर गप्पा मारायला सुरूवात केली. साधारणपणे एक आठवड्यावर उत्तेजक गप्पा मारल्यानंतर मारवाहकडे हवाई दलाशी संबंधीत काही दस्तऐवजांसंदर्भात चर्चेला सुरूवात झाली.

मारवाह याने, ही माहिती पैशांच्या बदल्यात दिली का ? यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. त्यांच्या मते आयएसआयच्या गप्पात येऊन तो ही माहिती देत होता. आतापर्यंत मारवाहने जे दस्तऐवज दिले आहेत, ते सर्व युद्धसराव आणि प्रशिक्षणसंदर्भातील असल्याचे समजते. यासंदर्भात त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments