Friday, March 29, 2024
Homeदेशबाबासाहेबांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे भदंत प्रज्ञानंद यांचे निधन

बाबासाहेबांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे भदंत प्रज्ञानंद यांचे निधन

लखनौ – भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे भदंत प्रज्ञानंद यांचे गुरुवारी प्रदिर्घ आजारामुळे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. रविवारी त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने लखनौमधील किंग जार्ज मेडिकल यूनिवर्सिटी (केजीएमयू)मध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. गुरुवारी ११ वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

केजीएमयूच्या सीएमएस डॉ. एस. एन शंखवार यांनी सांगितले की, भदंत प्रज्ञानंद यांचे गुरुवारी ११ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांना छातीचे दुखणे आणि श्वास घेण्यास होणारा त्रास यामुळे ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना केजीएमयूमधील गांधी वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते.
बौद्ध भिक्षु प्रज्ञानंद यांचा जन्म श्रीलंकेमध्ये झाला होता. १९४२ मध्ये डॉ. प्रज्ञानन्द भारतात आले होते. प्रज्ञानंद लखनौमधील रिसालदार पार्क येथील बुद्ध विहारामध्ये राहत होते. प्रज्ञानन्द यांनी १४ एप्रिल, १९५६ ला नागपूर मध्ये सात भिक्षुंच्या सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments