Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशमाविन गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून हाकला- काँग्रेस

माविन गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून हाकला- काँग्रेस

पणजी – वीजमंत्रीपदी असताना केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्य़ाबाबत माविन गुदिन्हो यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. तक्रारदार आणि आरोपी हे दोघेही गोव्याच्या मंत्रिमंडळात आहेत. गुदिन्हो यांची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी केली जावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर व सिद्धनाथ बुयांव यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

आता मुख्यमंत्रीपदी असलेल्या मनोहर पर्रीकर यांनीच विरोधी पक्षनेतेपदी असताना गुदिन्हो यांच्याविरुद्ध तक्रार सादर केली होती. त्याच पर्रीकर यांनी गुदिन्हो यांना मंत्रिमंडळात घेतले आहे. पर्रीकर यांनी गुदिन्हो यांना मंत्रीपद दिले आहे. माविन वीजमंत्री असताना पूर्ण गोव्यात पर्रीकर यांनी मोठा गोंधळ माजवला व न्यायालयाने उद्योगांचा वीज पुरवठा बंद ठेवला होता. अनेक उद्योगांची त्यावेळी मोठी हानी झाली. पर्रीकर त्या हानीला कारण ठरतात. आता त्यांनी गुदिन्हो यांना मंत्रिमंडळात ठेवू नये, असे बुयांव म्हणाले. गोव्यात वीजबंदी लागू झाली होती तेव्हा कसेबसे जनरेटरच्या आधारे दोन वर्षे काही उद्योग चालत होते. अनेक छोटे उद्योग प्रचंड अडचणीत आले होते. पर्रीकर यांचे काही नुकसान झाले नाही. ते आता गुदिन्हो यांना मंत्रिमंडळात घेऊन बसले आहेत. जर र्पीकर यांना त्यांची तक्रार खरीच होती व आहे असे वाटत असेल तर त्यांनी गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून वगळावे. अनेक भ्रष्ट राजकारण्यांचे मुख्यमंत्री गॉडफादर बनले आहेत,अशी टीका बुयांव यांनी केली.

आरोप निश्चित करण्याबाबतच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला गुदिन्हो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही व युक्तीवाद करण्यास सांगितल्याने गुदिन्हो यांना सर्वोच्च न्यायालयातील त्यांची विशेष आव्हान याचिका मागे घ्यावी लागली आहे.

दरम्यान, पणजीतील पाणीप्रश्नी बोलताना गिरीश चोडणकर म्हणाले, की पणजीत कुठच्या भागात लोकांना पाण्याची समस्या कशी भोगावी लागते ते आपल्याला ठाऊक आहे. कारण आपण गेल्या निवडणुकीवेळी पणजीतील प्रत्येक घरी भेट दिली. पणजीतील प्रत्येक तिस:या मतदाराने आपल्याला मत दिले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे निवडणुकीवेळी पणजीवासियांच्या घरी गेले नाही. त्यामुळे त्यांना पाणी समस्या कळली नाही. त्यांनी आपल्यासोबत यावे. आपण त्यांना पाणी समस्या असलेल्या पणजीवासियांच्या घरी घेऊन जातो. त्यांनी लोकांचे म्हणणो ऐकावे, असे चोडणकर म्हणाले.पणजीत पाण्याचा प्रश्नच नाही, असे भाजपचे पदाधिकारी म्हणतात. त्यांचे धाडस पाहून आपल्याला दु:ख वाटत नाही व हसताही येत नाही. त्यांना देवाने माफ करावे एवढेच आपण म्हणू शकतो, असे चोडणकर म्हणाले. आपली मुख्यमंत्र्यांशी कधीही याप्रश्नी जाहीर चर्चेची तयारी आहे, त्यांनी वेळ व जागा ठरवावी, असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments