Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशमुख्यमंत्री शिवराज चौहान खोटारडे, भाजप नेत्याचा घरचा आहेर!

मुख्यमंत्री शिवराज चौहान खोटारडे, भाजप नेत्याचा घरचा आहेर!

भोपाळ – मुरेना जिल्ह्यातील भाजपच्याच एका माजी आमदाराने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान खोटे बोलण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नसल्याचा आरोप केला आहे. परशुराम मुद्गल असे त्या भाजप नेत्याचे नाव आहे. या गंभीर आरोपानंतर भाजप त्या नेत्यावर कारवाई करणार की वाद मिटवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मुद्गल म्हणाले,  मी भाजपमध्ये आहे आणि भाजपमध्येच राहणार आहे. मात्र, या सरकारकडून जी आश्वासने दिली जातात. ती पूर्ण केली जात नाहीत. मुख्यमंत्री चौहान यांच्याबाबात बोलायचे झाल्यास खोटे बोलण्याशिवाय कोणेही काम ते करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मंत्रीमंडळालाही अशा प्रकारचीच शिकवण मिळाली असेल आणि यांच्या या खोटारडेपणाला मध्य प्रदेशची जनता २०१८ च्या निवडणुकीमध्ये नक्कीच उत्तर देईल असेही ते यावेळी म्हणाले.
भाजप सरकारकडून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याबाबत वरिष्ठ नेत्यांकडेही त्यांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र, भाजपचे सर्व नेते मान खाली घालून ऊभे राहत आहेत. एखाद्या घरातील महिला खूप अरेरावी करत असेल आणि घरातील सर्व मंडळी खाली मान घालून उभे राहतात त्या पद्धतीने या मंत्रीमंडळाची परिस्थिती झाल्याची टीका मुद्गल यांनी केली.
या प्रकरणी भाजप नेते अपूर्ती निगमचे अध्यक्ष डॉ. हितेश वाजपेयी यांनी मुद्रल हे असंतुष्ट आत्मा असल्याची टीका करत पक्ष त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments