Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशहार्दिक पटेलने घेतली तोगडियांची भेट, मोदी-शहांनी कट रचल्याचा केला आरोप

हार्दिक पटेलने घेतली तोगडियांची भेट, मोदी-शहांनी कट रचल्याचा केला आरोप

अहमदाबाद : पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी प्रवीण तोगडिया यांची चंद्रमणी रुग्णालयात जाऊन भेट घेतलीय. राजस्थानचे पोलीस एका जुन्या खटल्यात प्रवीण तोगडियांना अटक करण्यासाठी काल अहमदाबादमध्ये आले असता तोगडिया अचानक बेपत्ता झाले होते.

अखेर रात्री दहा वाजता तोगडिया अहमदाबादमधल्याच चंद्रमणी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. रात्री उशिरा त्यांना शुद्ध आल्यानंतर आज सकाळी त्यांनी हाताला सलाईन सुरू असतानाच पत्रकार परिषद घेतली आणि भाजप सरकारवर गंभीर आरोप केला. राजस्थान पोलिसांचा काल माझं एन्काऊंटर करण्याचा डाव होता, असा सनसनाटी आरोप तोगडियांनी यांनी केलाय. त्यावर मोदी आणि शहाच प्रवीण तोगडियांना त्रास देऊ पाहत असून हे त्याचेच षडयंत्र असल्याचा थेट आरोप हार्दिक पटेल यांनी केलाय.

तसंच या प्रकरणी आपण प्रवीण तोगडिया यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचंही हार्दिक पटेल यांनी सांगितलंय. काल सुद्धा हार्दिक पटेल याने प्रवीण तोगडिया यांच्या बेपत्ता होण्यावरून मोदी-शहांना थेट टार्गेट केलं होतं. प्रवीण तोगडिया गायब होऊनही भाजप सरकार गप्प का ? असा सवाल हार्दिक पटेलनं विचारला होता. मनमोहन सिंग यांच्या काळात प्रवीण तोगडिया अशा पद्धतीने गायब झाले असते तर भाजपने देशभरात दंगली घडवल्या असत्या. मग आता भाजप गप्प का ? असा सवाल हार्दिक पटेलनं उपस्थित केलाय.

सूत्रांच्या माहितीनुसार गुजरातच्या राजकारणात प्रवीण तोगडिया आणि मोदींचं कधीच पटलेलं नाही, अशातच आता हार्दिकच्या रुपाने आणखी एक मोदी विरोधक प्रवीण तोगडिया यांच्याबाजुने मैदानात उतरल्याने गुजरातच्या हिंदुत्व राजकारणात वेगळेच रंग भरलेले बघायला मिळणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments