Friday, March 29, 2024
Homeदेशसंघाच्या नेत्याचे महिलेसोबत अश्लिल छायचित्र व्हायरल

संघाच्या नेत्याचे महिलेसोबत अश्लिल छायचित्र व्हायरल

आग्रा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नेता आणि भागवत कथा वाचकाचे त्याच्या मैत्रिणीसोबतचे अश्लील फोटो व्हायरल झाले आहेत. हा नेता विवाहित असून त्याला काही अपत्ये देखील आहेत. नुकतीच त्याला संघाच्या मोठ्या समरसता संगममध्ये महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती.

सैया येथील निवासी या प्रचारकाने या अगोदर पूर्वेकडील ब्रजमध्ये मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे. या संघ प्रचारकाचा मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हास्तरावरील पदाधिकारी आहे. मुलगा पदाधिकारी होण्यासोबतच भागवतकथा वाचक असून सध्या मथुरा येथे राहतो. या प्रचारकाच्या मुलाकडे हारमोनियम शिकण्यासाठी येणाऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्या महिलेच्या लग्नानंतर देखील हा प्रकार सुरूच होता. महिलेच्या पतीने या प्रकाराला विरोध केला व पत्नीला घेऊन आग्रा शहरात राहण्यास गेला.
यानंतर देखील हा संघ नेता त्या महिलेच्या घरी जाऊन महिलेशी संबंध ठेवत होता. त्यामुळे महिलेच्या वैतागलेल्या पतीने घरात सीसीटीव्ही लावला. त्यानंतर पत्नीने बराच गोंधळ केला. ४ महिन्यांपूर्वी या महिलेने सैया येथे पतीच्या विरोधात फेसबुकसोबत छेडछाड, मोबाईलशी छेडछाड आणि अश्लील फोटो टाकण्याची तक्रार दिली. या प्रकरणी पतीला तुरूंगात जावे लागले. सध्या हा पती जामिनावर बाहेर आहे. काल सायंकाळी अचानक आग्रा येथे व्हॉट्सअॅप ग्रुपवर या संघ पदाधिकाऱ्याचे आणि त्या महिलेचे अश्लील फोटो टाकण्यात आले. यात असेही स्पष्ट लिहिण्यात आले की, हा व्यक्ती भाजप आणि संघाचा कार्यकर्ता आहे. यानंतर काही वेळेतच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
या घटनेनंतर भाजप आणि संघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने यावर आपली बाजू मांडलेली नाही. या प्रचारकाच्या मुलावर याच महिन्यात आग्राच्या सुनारी गावात होणाऱ्या संघाच्या समरसता संगम कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात स्वतः मोहन भागवत देखील सहभागी होणार आहेत. नाव न छापण्याच्या अटीवर एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अनैतिक संबंधांमुळे त्या महिलेचा पती उद्ध्वस्त झाला होता आणि त्याचे कुटुंबही तुटले होते. पतीनेच राग काढण्यासाठी हे फोटो व्हायरल केले आहेत. या प्रकरणी कोणताही नेता अथवा पदाधिकारी जबाब द्यायला तयार नाही.

यापूर्वी एका नेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता….

काही दिवसांपूर्वी भाजपाचा एक नेता एका महिलेसोबत एसटीमध्ये अश्लिल चाळे करत होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या नेत्याविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments