Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशसीडीच्या नादात भाजपला जाहीरनाम्याचा विसर: हार्दिक पटेल

सीडीच्या नादात भाजपला जाहीरनाम्याचा विसर: हार्दिक पटेल

महत्वाचे…
१.पंतप्रधान जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी ते भारताच्या सुनेला बारगर्ल म्हणायचे, ते योग्य होते का? २. गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी होणार ३. पहिल्या टप्प्यात ८९ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार


अहमदाबाद हार्दिक पटेल यांचे महिलेसोबतचे व्हिडिओ समोर येत असतानाच शुक्रवारी हार्दिक पटेलने ट्विटरच्या माध्यमातून भाजपला चिमटा काढला आहे. सीडीच्या नादात भाजपला जाहीरनाम्याचा विसर पडल्याचा टोला त्यांनी लगावला.

गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी होणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. मात्र, अद्याप भाजपने जाहीरनामा प्रकाशित केलेला नाही. या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेलने ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला. गुजरातमध्ये विकासासोबत जाहीरनामाही हरवला आहे. तुम्हाला कोणीही काही बोलणार नाही, तुम्ही तुमच्या शैलीत जाहीरनामा सादर करा, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सीडीच्या नादात भाजपला जाहीरनाम्याचा विसर पडला, असा टोला त्यांनी लगावला.

गुजरातमध्ये सध्या धर्मावरही आचारसंहिता लागू झाली आहे. सुरतमध्ये रामकथेसाठी जात असताना पोलिसांनी अडवले, असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधानांविषयी अपशब्द वापरणाऱ्या नेत्याला काँग्रेसने तडकाफडकी निलंबित केले. पण पंतप्रधान जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी ते भारताच्या सुनेला बारगर्ल म्हणायचे, ते योग्य होते का, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येत असताना हार्दिक पटेल यांची कथित सीडी व्हायरल झाली होती. गुरुवारी त्यांचा एका महिलेसोबतचा आणखी एक व्हिडिओ जाहीर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेलने हे ट्विट केले आहे. पाटीदार समितीने या व्हिडिओंमागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजप अशा स्वरुपाचे आणखी ५३ व्हिडिओ प्रसारित करु शकते. हार्दिक पटेल यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच भाजपने हे षडयंत्र रचले असा दावा पाटीदार नेते करत आहे. तर हार्दिक पटेल यांनी देखील यावरुन भाजपवर निशाणा साधला होता. गुजरातमध्ये भाजपच्या घाणेरड्या राजकारणाला सुरुवात झाली असून कितीही बदनामी केली तरी मला फरक पडणार नाही, पण गुजरातमधील महिलांचा अपमान केला जातोय, असे त्यांनी म्हटले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments