Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ९ नोव्हेंबर २०१७ रोजी मतदान होणार असून मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे.

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखांबाबत घोषणा अपेक्षित होती, मात्र गुजरातच्या निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मात्र १८ डिसेंबरपूर्वी गुजरात विधानसभेच्या निवडणुका पार पडतील, अशी ग्वाही केंद्रीय निवडणूक आयोग आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी दिली.

हिमाचल प्रदेशातील निवडणुका ईव्हीएमद्वारे पार पडणार आहेत. गुरुवार, ९ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकांच्या घोषणेनंतर तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे. सोमवार, १८ डिसेंबर २०१७ रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.

हिमाचलमध्ये ४९.०५ लाख मतदार असून त्यामध्ये २० हजार नवमतदारांचा समावेश आहे. ७ हजार ५२१ मतदार संघांवर ही मतदान प्रक्रिया पार पडेल. उमेदवारांसाठी खर्चाची मुदत २५ लाख रुपये आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments