Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेश६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत मोबाइल क्रमांकाला आधार जोडता येणार

६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत मोबाइल क्रमांकाला आधार जोडता येणार

1.प्राप्तिकर विभागाकडून ३३ कोटी पॅन कार्ड वितरीत 2. त्यापैकी ४१ टक्के म्हणजे १४ कोटी पॅनकार्ड आधार कार्डबरोबर लिंक झाले 3. मोबाइलला क्रमांकाला आधार क्रमांक जोडण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०१८


नवी दिल्ली |   केंद्र सरकारने बँक खात्याशी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची ३१ डिसेंबरची मुदत मागे घेतली आहे. अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागाने मंगळवारी यासंबंधीचे परिपत्रक काढले असून पुढील मुदत चर्चेअंती ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने सर्व कामांसाठी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. नुकताच सरकारने बँक खात्याशी आधार लिंक करण्याची अखेरची मुदत वाढवून ३१ मार्च २०१८ केली होती. त्यापूर्वी आधार आणि बँक खाते लिंक करण्याची अखेरची मुदत ही ३१ डिसेंबर २०१८ होती. आता नवीन मुदतही हटवण्यात आली आहे. आता बँक खात्याशी आधार लिंक करण्याची कोणतीच मुदत नाही. अंतिम मुदत काय असेल याबाबत सरकारकडून नंतर माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर इतर ठिकाणी आधार लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आलेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाकडून ३३ कोटी पॅन कार्ड वितरीत करण्यात आले असून त्यापैकी ४१ टक्के म्हणजे १४ कोटी पॅनकार्ड आधार कार्डबरोबर लिंक झाले आहेत. तर ११५ कोटी लोकांकडे आधार कार्ड आहे.

दरम्यान, ८ डिसेंबरला सरकारने आधारला पॅन कार्डशी लिंक करण्याची अखेरची मुदत वाढवून ती ३१ मार्च २०१८ करण्यात आली होती. पॅन कार्डशी आधार लिंक केल्याशिवाय पुढच्या वर्षी कर भरता येणार नाही. दरम्यान, यावर्षीही ज्या लोकांनी आधार-पॅनला लिंक केले नव्हते. त्यांना कर जमा करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गुरूवारी आधारबाबत सर्वोच्च न्यायालयात एक महत्वाची सुनावणी होणार आहे. ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही, सरकार त्यांच्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१७ ऐवजी ३१ मार्च २०१८ पर्यंत करत असल्याचे मागील सुनावणीवेळी केंद्र सरकारकडून अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यासाठी शुक्रवारी परिपत्रक जारी केले जाईल. दरम्यान, मोबाइल क्रमांकाला आधार क्रमांक जोडण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०१८ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही मुदत वाढवली जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments