Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशलेनिन दहशतवादीच- सुब्रमण्यम स्वामी

लेनिन दहशतवादीच- सुब्रमण्यम स्वामी

Lenin statueमहत्वाचे…
१. त्रिपुरातील विजय झाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रशियन राज्यक्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा तोडला
२. पुतळा कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयात ठेवावा
३. त्रिपुरातील परिस्थिती चिघळली


दिल्ली: त्रिपुरात सुरु असलेल्या वादात भाजपाचे वाचाळवीर नेते सुब्रमण्यम् स्वामी यांनीही उडी घेतली आहे. अतिउत्साही कार्यकर्त्यांनी विजयाचा उन्माद दाखवत त्रिपुरातील लेनिनचा पुतळ्याची तोडफोड केली. या घटनेवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असताना लेनिन दहशतवादी होते, त्यांच्या पुतळा आपल्या देशात कशाला हवा? असं वादग्रस्त वक्तव्य करुन स्वामी यांनी वादाला आणखी खतपाणी घातलं आहे.

याआधीही सुब्रमण्यम स्वामी यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यं करत नवनवे वाद ओढावून घेतले होते. त्रिपुरातील निवडणुकीत विजय झाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रशियन राज्यक्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन यांच्या पुतळ्यावर बुलझोडर फिरवला. यामुळे त्रिपुरातील परिस्थिती चिघळली आहे. पण, ‘लेनिन तर विदेशी आहे आणि एकप्रकारे ते दहशतवादीच आहे त्यामुळे त्यांच्या पुतळ्याची देशात गरजच काय? तो पुतळा कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयात ठेवावा आणि तिथेच त्याची पुजा करा’ अशी वादग्रस्त प्रतिक्रिया स्वामी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

२०१३ मध्ये त्रिपुरात डाव्या पक्षांच्या विजयानंतर कृष्ण देवनाथ या स्थानिक कलाकाराने ३ लाख रुपये खर्च करुन लेनिन यांचा पुतळा तयार करुन तिथे तो उभारला होता. त्रिपुरातील निवडणुकीत डाव्यांची सत्ता उलथून भाजपानं यश मिळवलं आणि त्याच उन्मादात काही कार्यकर्त्यांनी या पुतळ्यावर बुलडोझर फिरवला. काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार या पुतळ्यांची कार्यकर्त्यांकडून विंटबनाही करण्यात आल्याचं माकपच्या नेत्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणानंतर त्रिपुरातील परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. स्वामींच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments