Friday, March 29, 2024
Homeदेशसंसद हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण!

संसद हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण!

नवी दिल्‍ली – संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १६ वर्षे पूर्ण झाले. १३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण जगात खळबळ माजवली होती. ही पहिलीच घटना होती, की देशाच्या संसदेवर पाच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

४५ मिनिटे चाललेल्या या घटनेने सर्वजण भयभीत होते. या हल्ल्यामुळे संसदेच्या आतील व बाहेरील सर्व लोकांनी मानसिक धक्का बसला होता. संसदेच्या आत मुख्य सभागृहात प्रवेश करून आतील सर्व खासदारांनी निशाणा बनविण्याचा उद्देश्य दहशतवाद्यांचा होता.
परंतु तेथे तैनात सुरक्षा रक्षकांनी त्यांचा मनसुबा उधळून लावला. या हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकांनी बाहेरच कंठस्नान घातले होते. या दहशतवादी हल्ल्यात दिल्ली पोलीस दलातील पाच जवान, सीआरपीएफची एक महिला काँस्टेबल आणि संसदेतील दोन सुरक्षारक्षक शहीद झाले होते. त्याचबरोबर १६ जवान जखमी झाले होते.
या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी पांढऱ्या रंगाची अँबेसेडर कार निवडली होती. कारण या कारची ओळख पटविणे खूप कठीण होते, कारण संसद भवन परिसरात अशा अनेक कार उभ्या असतात. दहशतवाद्यांच्या या कारवर गृह मंत्रालयाचे एक स्‍टीकरही लावण्यात आले होते. परंतु संसदेत प्रवेश करणे सोपे नसते. येथे आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व वाहनाची तपासणी करण्यात येते. दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी अशी वेळ निवडली ज्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू असेल व जास्तीत जास्त खासदार आतमध्ये उपस्थित असतील. त्यादिवशी शवपेट्यामध्ये केलेल्या भ्रष्टाचारावरून विरोधकांनी जोरदार गदारोळ संसदभवनात केला होता. या गदोराळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ४० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. दरम्यान पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी आपआपल्या निवासस्थानी निधून गेल्या होत्या. अन्य खासदार उपहारगृहात चहा-नाष्टा करत होते. त्यावेळीच हा भयंकर हल्ला करण्यात आला. सकाळी ११ वाजून २९ मिनिटांनी पाच दहशतवाद्यांनी एके-४७ रायफलीमधून फायरिंग सुरू केली. त्यावेळी तत्कालीन गृह मंत्री लाल कृष्ण आडवाणी आपले मंत्री व जवळपास २०० खासदारांसह संसदेत उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments