Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशकाँग्रेस-जनता दल सेक्युलर पक्षाच्या १७ अपात्र आमदारांचा भाजपात प्रवेश

काँग्रेस-जनता दल सेक्युलर पक्षाच्या १७ अपात्र आमदारांचा भाजपात प्रवेश

Within five years, the wealth of BJP ministers increasedबंगळुरू: कुमारस्वामी सरकारविरोधात बंडखोरी करणारे काँग्रेस-जनता दल सेक्युलर पक्षाचे १७ आमदार उद्या भाजपात बंगळुरू येथे प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश सोहळा मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा, भाजपा प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कतील यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वनाथनारायण यांनी दिल्लीत माध्यमांनी बोलताना दिली.

सर्वोच्च न्यायालायाने आज कर्नाटकात तत्कालीन कुमारस्वामी सरकारविरोधात बंडखोरी करणाऱ्या काँग्रेस-जनता दल सेक्युलर पक्षाच्या १७ आमदारांना अपात्र घोषित करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायम ठेवला. अपात्र आमदारांना पोटनिवडणूक लढवण्यास न्यायालयानं परवानगी दिली. हे आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. अशी घोषणा करण्यात आली आहे. सर्व आमदार ५ डिसेंबर रोजी कर्नाटकात १५ जागांसाठी पोटनिवडणुका लढवणार आहेत.

काँग्रेस-जेडीएसच्या १७ आमदारांनी कुमारस्वामी सरकारविरोधात बंड पुकारत कर्नाटकात भाजपासाठी अनुकूल भूमिका घेतली होती. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी व्हीप नाकारल्यानं या १७ आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरवले होते. तसेच चालू विधानसभेच्या कालावधीत निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय योग्यच असल्याचे सांगितलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments