झटका; देशात ५ वर्षांत १७० आमदारांचा काँग्रेसला रामराम!

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालातून माहिती आली समोर

- Advertisement -

नवी दिल्ली: देशात २०१६ ते २०२० या ५ वर्षांच्या काळात काँग्रेसच्या तब्बल १७० आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत इतर पक्षांचा रस्ता धरल्याची आकडेवारी समोर आली आहे. ADR अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने सादर केलेल्या अहवालामधून ही आकडेवारी जाहीर झाली असून त्याविरोधात सत्ताधारी भाजपमधून मात्र फक्त १८ आमदारांनी बाहेरची वाट धरली आहे. एडीआर रिपोर्टच्या हवाल्याने एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

२०१४मध्ये सत्तेत आलेल्या भाजपाने २०१९मध्ये देखील मोठा विजय मिळवत ३०० हून जास्त खासदार संसदेत निवडून आणले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाला सोडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या कमी असणं अपेक्षितच असल्याचं म्हटलं जात आहे.

३८ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

- Advertisement -

एडीआरच्या नव्या अहवालानुसार, २०१६ ते २०२० या कालावधीमध्ये देशभरात एकूण ४०५ विद्यमान आमदारांनी निवडणुका लढवल्या. त्यापैकी १७० आमदारांनी आपला पक्ष बदलून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

त्यापाठोपाठ ३८ आमदारांनी काँग्रेसमध्ये तर २५ आमदारांनी तेलंगणा राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय, २०१९च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान भाजपाच्या ५ विद्यमान खासदारांनी देखील पक्षाला रामराम केला तर काँग्रेसच्या ७ राज्यसभा खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

आमदारांच्या पक्षबदलाचा या राज्यांत निवडणुकांमध्ये परिणाम

या कालावधीमध्ये मध्य प्रदेश, मणिपूर, गोवा, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटक या ५ राज्यांमध्ये सत्ताबदल झाले आहेत. यामध्ये आमदारांनी मोठ्या प्रमाणावर पक्षबदल केल्याचं दिसून आलं असल्याचं देखील या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या कालावधीत १६ राज्यसभा खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे तर ५ लोकसभा खासदार काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

- Advertisement -