जवानांमध्ये वादावादी, गोळीबारात 6 जवान ठार!

- Advertisement -
Representational Image

नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील भारत तिबेट सीमा पोलीस दलातील (ITBP) एका जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात 6 जवान ठार झाले आहेत. त्यानंतर गोळीबार करणा-याने जवानाने आत्महत्या केली. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

कडेनारमध्ये ITBP च्या कॅम्पमध्ये हा खळबळजनक प्रकार घडला. ज्या जवानाने 6 जणांवर गोळीबार केला त्याचा देखील या घटनेत मृत्यू झाला आहे. जखमी जवानांना राजधानी रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ITBP चे आयजी पी. सुंदरराज यांनी ही माहिती दिली. राज्याचे गृह मंत्री ताम्रध्वज साहू यांनी या घटनेचा तपशील मागवला आहे. संबंधित जवानाने गोळीबार का केला यासंदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here