Friday, March 29, 2024
Homeदेशगँगरेपवरील हे ७ चित्रपट, प्रेक्षक आणि पुरस्कार!

गँगरेपवरील हे ७ चित्रपट, प्रेक्षक आणि पुरस्कार!

Gang rape of a minor girl in Solapurदिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. सात वर्षानंतर निर्भयाच्या दोषींना आज शुक्रवारी पहाटे ५:३० वाजता फाशी देण्यात आली. १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री निर्भयावर अत्याचार करुन हत्या करण्यात आली होती. बॉलिवूडने मोठ्या सामर्थ्याने गॅंगरेपचा विषय मोठ्या पडद्यावर ठेवला आहे. असे अनेक चित्रपट येथे तयार केले गेले असून यामुळे समाजात संदेशही पोहोचला आणि प्रेक्षकांसोबतच हे चित्रपट पुरस्कारासही पात्र ठरले आहेत.

ही आहेत ते ७ चित्रपट…

दामिनी

दामिनी हा चित्रपट १९९३ मध्ये आला होता. सनी देओल आणि मीनाक्षी स्टारर फिल्म ‘दामिनी’ ही एका गँगरेपची कहाणी आहे. चित्रपटात मीनाक्षी तिच्या दीराला मोलकरणीवर बलात्कार करताना बघते. एकाकी साक्ष असल्यामुळे मीनाक्षी तिच्या कुटूंबियांविरूद्ध जाते आणि न्यायासाठी लढा देते. या लढ्यात सनी देओलची साथ तिला मिळते. शेवटी अनेक चढ-उतारानंतर न्याय मिळतो. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट उत्कृष्ट संवाद आणि कोर्टरूम नाटकामुळे ब्लॉकबस्टर ठरला होता.

ग्रहण…

ग्रहण हा चित्रपट २००१ मध्ये रिलीज झालेल्या शशीलाल नय्यर यांचा हा चित्रपट बलात्कार पीडित पार्वतीच्या कथेवर आधारित आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलगा तिच्यावर बलात्कार करतो आणि त्यानंतर पार्वती न्यायाच्या शोधात भटकते. जॅकी श्रॉफची कंपनी जॅकी श्रॉफ एन्टरटेन्मेंट लि.चा हा पहिला चित्रपट होता आणि सुरुवातीला याचे शीर्षक ‘मनहूस’ ठेवण्यात आले होते.

मातृ…

रवीना टंडनवर आधारित ‘मातृ’ हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात गँगरेपची कहाणी दाखविली गेली. एका अपघातानंतर रवीना आणि तिच्या मुलीचे पहरण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला जातो. या अपघातात रवीना आपली मुलगी गमावते. यानंतर रवीना प्रसिद्ध राजकारण्याच्या मुलाच्या विरोधात न्यायिक लढा देते

भूमी…

संजय दत्त आणि आदिती राव हैदरी स्टारर फिल्म ‘भूमी’ हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सामूहिक बलात्काराच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात आदितीने भूमीची भूमिका साकारली होती. सामूहिक बलात्काराचा बळी पडल्याने भूमीचे आयुष्य पूर्णपणे बदलते. वडील संजय दत्त जेव्हा न्यायाकडे जाण्यासाठी पोलिसांकडे जातात तेव्हा त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जाते. लोकांचा दृष्टीकोन पाहून संजय बराच आक्रमक होतो. मुलीला न्याय मिळावा यासाठी संजय स्वत: आरोपीचा खून करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले होते.

काबिल…

२०१७ मध्ये रिलीज झालेला हृतिक रोशन आणि यामी गौतम स्टारर हा चित्रपट सामूहिक बलात्कारावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट एका जोडप्याची कथा आहे जो अंध आहेत. भांडणावर चिडून काही गुंड यामी गौतमवर बलात्कार करतात. कायदेशीर कारवाईस उशीर करण्यासाठी गुंड या दाम्पत्याचे अपहरण करतात. त्यानंतर पोलिस या दाम्पत्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करून केस बंद करतात. या घटनेनंतर यामी गौतम आत्महत्या करते आणि न्याय मिळवण्यासाठी हृतिकने स्वतः आरोपींना शिक्षा देतो.

मॉम…

मॉम हा चित्रपट २०१८ मध्ये आला होता. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. या चित्रपटात आई मुलीची कहाणी दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात श्रीदेवीच्या मुलीची भूमिका पाकिस्तानी अभिनेत्री सजल अलीने साकारली होती. ‘मॉम’ चित्रपटात सावत्र मुलीवर बलात्कार झाल्यानंतर आई आरोपींचा कसा सूड घेते हे दाखवले आहे. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

मर्दानी-2 

हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट बलात्काराच्या घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी पोलिस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत झळकली. कोटा येथील घृणास्पद बलात्कार प्रकरण सोडविण्याची कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments