Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेश९ चिमुरड्यांना चिरडणाऱ्या भाजप नेत्याचे आत्मसमर्पण

९ चिमुरड्यांना चिरडणाऱ्या भाजप नेत्याचे आत्मसमर्पण

मुझफ्फरपूर:  हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि भाजप नेता मनोज बैठाने अखेर आत्मसमर्पण केले आहे. मनोजवर ९ शाळकरी मुलांना मद्यधूंद अवस्थेमध्ये चिरडल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तो मागच्या तीन दिवसांपासून फरार होता.

मनोजने त्याच्या सरकारी निवासस्थानी आत्मसमर्पण केल्याची माहिती मुझफ्फरपूरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक कुमार यांनी दिली. या दुर्घटनेच्या दरम्यान मनोजला दुखापत झाली असून त्याला पटणा मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे आहे प्रकरण ?

मुझफ्फरपूरमध्ये शनिवारी महामार्गालगत शाळेत जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना भरधाव बोलेरो कारने चिरडले. या अपघातामध्ये ९ विद्यार्थी जागीच ठारतर २४ जण जखमी झाले होते. मनोज बैठावर ही बोलेरो गाडी चालवल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये दारुबंदी असूनही मनोजने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून हा अपघात केला. या अपघातानंतर मनोज ३ दिवस फरार होता. मनोजला जन्मठेपीची शिक्षा द्यावी अशी मागणी या अपघातामध्ये मृत पावलेल्या मुलीचे वडील मोहम्मद अंसारी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments