पती, दोन वर्षांच्या मुलासमोर विवाहितेची गोळी झाडून हत्या

- Advertisement -

नवी दिल्ली : दिल्लीतील गजबजलेल्या शालिमार बाग परिसरात विवाहितेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पती आणि दोन वर्षांच्या मुलाच्या डोळ्यांदेखतच महिलेवर गोळीबार करण्यात आला.

मंगळवारी रात्री प्रिया मेहरा पती पंकज आणि मुलासोबत गुरुद्वारातून कारने घरी येत होती. त्यावेळी आरोपींनी आपली कार मेहरा कुटुंबाच्या कारसमोर नेली. आरोपींनी पंकजच्या दिशेने झाडलेली गोळी प्रियाला लागली. पंकज आणि मुलाला दुखापतही झाली नाही. ‘प्रियाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. पोलिस येईपर्यंत उपचार करण्यास रुग्णालयाने नकार दिल्याचा दावा प्रियाच्या कुटुंबीयांनी केला. पोलिसांनीही केस नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मेहरांनी केला आहे. प्रिया गृहिणी होती, तर तिचा पती पंकज पहाडगंज भागात बिझनेस करतो.

- Advertisement -