Thursday, March 28, 2024
Homeदेशश्रीनगरमध्ये सीआरपीएफ च्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला

श्रीनगरमध्ये सीआरपीएफ च्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला

श्रीनगर : श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या कॅम्पला दोन दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. दोन दिवसांपूर्वी झालेला लष्करी तळावरील हल्ला ताजा असताना आज (सोमवार) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. श्रीनगरच्या करण नगर इथं ही घटना घडली आहे.

आज पहाटे ४.३० वाजता अंधाराचा फायदा घेत एके-47 असलेल्या दोन दहशतवाद्यांनी या कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. पण कायम सतर्क असणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.
त्यामुळे या दहशतवाद्यांनी जवळच्याच इमारतीत घुसून तिथून गोळीबार सुरु केला. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या संपूर्ण इमारतीलाच घेराव घातला. दरम्यान, गेल्या सात ते आठ तासापासून दोन्ही बाजूने सतत गोळीबार सुरु आहे. या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी जवानांनचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. गेल्या दोन दिवसात लष्करावर हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी १० फेब्रुवारीला पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने जम्मू-पठाणकोट हायवेवरील सुंजावाँ लष्करी तळावर हल्ला केला होता. ज्यामध्ये पाच भारतीय जवान शहीद झाले होते. तर यावेळी चार दहशतवाद्यांनाही ठार करण्यात आलं होतं. दरम्यान, लष्करी तळावर हल्ला करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही दहशतवाद्यांनी आपल्या जवानांनवर हल्ले केले आहेत.

दहशतवाद्यांनी आतापर्यंत कोण-कोणत्या लष्करी तळावर हल्ले केले?

१८ सप्टेंबर २०१६ : उरीमधील लष्करी तळाव दहशतवाद्यांचा हल्ला, भारतीय लष्कराचे १९ जवान शहीद
२९ नोव्हेंबर २०१६ : जम्मू-काश्मीरच्या नगरोटामधील लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, ७जवान शहीद, दोन दहशतवादी ठार
२७ एप्रिल २०१७ : कुपवाडाच्या पंजगाममध्ये लष्करी तळावर हल्ला, 3 जवान शहीद, 2 दहशतवादी ठार
५ जून २०१७ : बांदीपुराच्या सुंबलमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर दहशतावादी हल्ला, यामध्ये लष्कराने चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.
२७ ऑगस्ट २०१७ : पुलवामाच्या पोलीस लाईनवर दहशतवादी हल्ला, ८ जवान शहीद, तीन दहशतवादी ठार

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments