Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशअखेर तेलगू देसमचाही ‘एनडीए’ला विडकोलु?

अखेर तेलगू देसमचाही ‘एनडीए’ला विडकोलु?

आंधप्रदेश: आगामी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने नुकतीच एनडीएपासून फारकत घेतली होती. त्यानंतर आता आंध्र प्रदेशच्या तेलगू देसम पार्टीकडूनही (टीडीपी) एनडीएला रामराम केला जाण्याची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष एनडीएआघाडीतील प्रमुख घटकपक्षांपैकी एक आहे. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडून गुरुवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानंतर चंद्राबाबू प्रचंड नाराज झाल्याचे समजते.

या पार्श्वभूमीवर चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठकही बोलावली होती. या बैठकीत अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला अपेक्षित वाटा न मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावरून आता टीडीपी भाजपसोबत असलेली युती तोडायचा विचार गांभीर्याने करत आहे. आम्ही आता युद्ध छेडायच्या तयारीत आहोत. आता आमच्यासमोर केवळ तीन पर्याय आहेत. एक म्हणजे प्रयत्नपूर्वक युती कायम ठेवणे, दुसरे म्हणजे आमच्या खासदारांनी राजीनामा देणे किंवा तिसऱ्या पर्यायाचा अवलंब करायचा झाल्यास आम्हाला भाजपासोबतची युती तोडावी लागू शकते, अशी प्रतिक्रिया टीडीपी खासदार टीजी व्यंकटेश यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments