Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशपी. चिदंबरम, शिवकुमार नंतर माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यावर कारवाईचा बडगा

पी. चिदंबरम, शिवकुमार नंतर माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यावर कारवाईचा बडगा

Harish Rawat,Rawat,Harish,CBI,Sharad Pawar,DK Shivakumarनवी दिल्ली: माजी गृहमंत्री पी. चिदंबरम, माजी मंत्री डीके शिवकुमार नंतर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते हरीश रावत यांच्या विरोधात सीबीआयकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मार्च २०१६ मध्ये उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याकडून आपले सरकार वाचवण्यासाठी आमदारांची खरेदी-विक्री करण्यात आल्याचा आरोप होता. त्यानंतर उत्तराखंडमधील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले व ३१ मार्च २०१६ रोजी राज्यपालांच्या शिफारसीनुसार हरीश रावत यांच्याविरोधात सीबीआय चौकशी सुरू झाली.
याप्रकरणी सीबीआयने प्राथमिक तपास अहवाल न्यायालयात सादर करत, हरीश रावत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या एकापाठोपाठ नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments