Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशशिवसेनेपाठोपाठ झारखंडच्या 'या' पक्षानेही सोडली भाजपची साथ

शिवसेनेपाठोपाठ झारखंडच्या ‘या’ पक्षानेही सोडली भाजपची साथ

Chirag Paswan
दिल्ली: सत्तासंघर्षावरून शिवसेनेनं महाराष्ट्रात भाजपची साथ सोडत एनडीएपासून फारकत घेतली. त्यानंतर आता झारखंडमध्येही राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मधील लोक जनशक्ती पार्टीने भाजपची साथ सोडली. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

जनशक्ती पार्टीने झारखंड विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभेसाठी ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यात मतदान होणार आहे. २३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवानकडे आता पक्षाची सूत्रे आहेत. भाजपासोबत आघाडी न करता निवडणूक लढवण्याच्या मुद्दावर चिराग पासवान म्हणाले की, निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाच्या प्रदेश शाखेचा आहे. लोक जनशक्ती पार्टीने ५० जागा स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडनेही झारखंड विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये भाजपा, एलजेपी आणि जेडीयूचे आघाडी सरकार आहे. भाजपा एजेएसयूसोबत मिळून झारखंड विधानसभेची निवडणूक लढवत आहे. भाजपाने रविवारीच ५२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. एनडीएचे एक एक घटक पक्ष साथ सोडत असल्यामुळे भाजपला एकामागून एक धक्के बसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments