Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशआखाडा परिषद भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर करणार?

आखाडा परिषद भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर करणार?

लखनौ: साधू-संतांची सर्वात मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने, पुन्हा एकदा भोंदू बाबांबाबत कडक पावलं उचलली आहेत.पहिली यादी जाहीर केली होती. आता दुसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे.

बाबा वीरेंद्र देव दीक्षितच्या कारनाम्यानंतर, साधू-संतांची प्रतिमा मलिन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेने भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. आखाडा परिषदेने शुक्रवार २९ डिसेंबरला अलाहाबादमध्ये तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही आखाडा परिषदेने भोंदू बाबांची यादी जाहीर केली होती. यामध्ये गुरमीत राम रहीम, राधे मा, निर्मल बाबा, असीमानंद आणि नित्यानंदसह चौदा बाबांची नावं होती.
मात्र ही यादी जारी करणारे महंत मोहनदास महाराज काही दिवसातच बेपत्ता झाले आहेत.
दरम्यान, आखाडा परिषद उद्याच्या बैठकीत योगी सरकारद्वारे अर्द्धकुंभचं कुंभ असं नामांतर केलेल्या निर्णयावरही चर्चा करणार आहे. पुढील वर्षी अर्द्धकुंभ होत आहे. मात्र अर्द्धकुंभची मोठी परंपरा आहे, त्यामुळे त्याचं नाव बदलणं योग्य नाही, अशी साधूंची भूमिका आहे. महंत मोहन दास हे हरिद्वारहून मुंबईकडे जाताना रेल्वेतून बेपत्ता झाले. त्यांचा अजूनही पत्ता नाही. महत्त्वाचं म्हणजे आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर हा प्रकार घडल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अलाहाबादमध्ये बैठकीनंतर आखाडा परिषदेने १४ भोंदू बाबांची यादी जारी केली होती. त्यानंतर आखाडा परिषदेला अनेक धमक्या येत होत्या. त्या धमक्यांनंतर महंत मोहनदास बेपत्ता झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments