सर्व हक्क पंतप्रधानांकडे, अन्य मंत्री शक्तीहीन – राहुल गांधी

- Advertisement -

नवी दिल्ली – नरेंद्र मोदी सरकारमध्ये सर्वाधिकार मोदींकडेच असून सुषमा स्वराज सारख्या वरिष्ठ मंत्र्यांनाही अधिकार नसल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ते पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या ११२ व्या वार्षिक सत्रामध्ये बोलत होते.

मोदींवर सत्तेच्या केंद्रीकरणाचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांना युपीए सरकारमध्ये सत्ता काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या १० जनपथ या निवासस्थानी केंद्रीत असल्याचे विचारल्यावर त्यांनी ते नाकारले. ते म्हणाले, ‘हा एक गैरसमज आहे. त्यावेळी १० जनपथमध्ये सत्तेचे कोणतेही केंद्रीकरण नव्हते.’

‘आम्ही भाजप सरकारमधील मंत्र्यांशी बोललो. सुषमा स्वराज्य आणि इतर मंत्र्यांना देखील या सरकारमध्ये अधिकार नाहीत. सर्व अधिकार केवळ पंतप्रधानांकडे आहेत. काँग्रेस ज्या पद्धतीने सरकार चालवत होते त्यापेक्षा या सरकारची पद्धत खुपच वेगळी आहे.’

- Advertisement -

राहुल गांधी यांनी यूपीए-२ सरकारच्या अखेरच्या काळात सरकारमध्ये काही त्रुटी राहिल्याचेही मान्य केले. सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांच्या गरजेविषयी बोलताना गांधी म्हणाले की, यूपीए सरकारमध्ये सध्याच्या सरकारपेक्षा अधिक तरुण चेहरे होते. सरकारमध्ये शक्य तेवढे जास्त तरुण चेहरे असायला हवेत. भविष्यात कोणत्याही काँग्रेस सरकारमध्ये तरुणांची संख्या अधिक असेल.’ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याशी झालेल्या चर्चेचे देखील महत्त्व त्यांनी यावेळी नमुद केले.

- Advertisement -