Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशअ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचा आज देशव्यापी बंद, काय आहे कारण जाणून घ्या

अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचा आज देशव्यापी बंद, काय आहे कारण जाणून घ्या

नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनने आज म्हणजे 11 डिसेंबर 2020 ला देशभरात डॉक्टरांच्या संपाची घोषणा केली आहे. आयएमएने आयुर्वेदच्या पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांना सर्जरीची मंजूरी देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात संपाची घोषणा केली आहे.

देशव्यापी संपाच्या दरम्यान सर्व अनावश्यक आणि विना कोविड सेवा बंद राहतील. मात्र, आयसीयू आणि सीसीयू सारख्या इमर्जन्सी सेवा जारी राहतील. मात्र, अगोदर ठरलेली ऑपरेशन्स होणार नाहीत. आयएमएने संकेत दिला आहे की, येत्या आठवड्यात आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते.

प्रायव्हेट हॉस्पीटलमध्ये बंद राहतील ओपीडी

आयएमएच्या संपाच्या दरम्यान खासगी हॉस्पीटलमधील ओपीडी बंद राहतील, परंतु सरकारी हॉस्पीटल सुरू राहतील. खासगी हॉस्पीटलमध्ये केवळ इमर्जन्सी आरोग्य सेवा जारी राहतील.

देशभरातील खासगी हॉस्पीटल्सने संपावर चिंता व्यक्त केली आहे. सोबतच आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी पावले उचलली जात आहेत. आयएमएने म्हटले की, 11 डिसेंबरला सर्व डॉक्टर सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी वाजेपर्यंत संपावर राहतील.

काही दिवसांपूर्वी सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (सीसीआयएम) कडून जारी अधिसूचनेत म्हटले होते की, आयुर्वेदचे डॉक्टरसुद्धा आता जनरल आणि ऑर्थोपेडिक सर्जरीसह डोळे, कान, घशाची सर्जरी करू शकतील.

केंद्र सरकारने 39 सामान्य सर्जरीची दिली आहे मंजूरी

आयएमएने म्हटले आहे की, सीसीआयएमची अधिसूचना आणि नीती आयोगाकडून चार समितीच्या गठनमुळे केवळ मिक्सोपॅथीला प्रोत्साहन मिळेल. असोसिएशनने अधिसूचना मागे घेणे आणि निती आयोगाकडून गठित समिती रद्द करण्याची मागणी केली आहे.

 सीसीआयएमने आयुर्वेदातील काही खास क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांना सर्जरी करण्याचा अधिकार दिला आहे. केंद्र सरकारने नुकताच एक अध्यादेश जारी करून आयुर्वेदात पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांना 58 प्रकारच्या सर्जरी शिकणे आणि प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली आहे.

सीसीआयएमने 20 नोव्हेंबर 2020 ला जारी अधिसूचनेत 39 सामान्य सर्जरी प्रक्रियांना सूचीबद्ध केले होते, ज्यांच्यामध्ये 19 प्रक्रिया डोळे, नाक, कान आणि घशाशी संबंधीत आहेत.

इतर मागण्या काय?

आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेद यांची तुलना होऊ शकत नसल्याने शस्त्रक्रिया परवानगी मागे घ्यावी.

राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने डॉक्टरांची सरमिसळ करण्यासाठी स्थापन केलेल्या चार समित्या त्वरित रद्द कराव्यात.

वैद्यकीय शाखांची सरमिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करावा.

 वैद्यक शाखांचा लोकांना जास्तीतजास्त उपयोग कसा होईल, यावर सरकारने भर द्यावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments