Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeदेशअमित शहा होम मिनिस्टर नव्हे, हेट मिनिस्टर : वृंदा करात

अमित शहा होम मिनिस्टर नव्हे, हेट मिनिस्टर : वृंदा करात

Amit Shah,Brinda Karatऔरंगाबाद : अमित शहा हे होम मिनिस्टर नव्हे तर हेट मिनिस्टर आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते दिसून आले. दिल्लीत यंत्रणेचा गैरवापर केला गेला तरीही मतदारांनी भाजपला नाकारले, असा आरोप माकप नेत्या वृंदा करात यांनी औरंगाबादेत केला.

ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा…

‘भाजप नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘गोली मारो…’ असे वक्तव्य दिल्ली निवडणूक प्रचारात केले होते. निकालानंतर शहा म्हणतात, असे म्हणायला नको होते. शहा यांना चूक लक्षात आली असेल तर आता ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणीच करात यांनी केली.

वृंदा करात यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरही टीका केली. सर्वसामान्य जनतेला अडचण करणारा अर्थसंकल्प मांडला गेला आहे. आता गॅस दरवाढ म्हणजे सर्वसामान्य कुटुंबावर हल्ला आहे. हे केंद्र सरकार पाकिटमार सरकार आहे, अशी तोफ करात यांनी डागली.

भाजपच्या पराभवानंतर अमित शाह म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी ‘गोली मारो’ असा नारा दिला, ‘ही निवडणूक म्हणजे भारत-पाकिस्तान सामना आहे,’ अशी तुलना केली. ‘भाजप नेत्यांनी प्रचारात केलेली यासंदर्भातील वक्तव्ये मुळीच योग्य नव्हती. ती आम्हाला भोवली असावीत,’ अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘टाइम्स नाऊ समिट’मध्ये बोलताना दिली होती. ‘भाजपच्या नेत्यांनी केलेली ती वादग्रस्त वक्तव्ये अजिबातच योग्य व स्वीकारार्ह नव्हती. ती पक्षाला मान्य नाहीत, हे आम्ही स्पष्ट केलेले होते. ती आम्हाला भोवली असावीत, आमच्या एकूण कामगिरीला त्या विधानांचा फटका बसला असावा, आमच्या पराभवाचे तेही एक कारण असावे,’ असे शहा म्हणाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments