बस- ट्रकमध्ये भीषण अपघात; १३ प्रवासी ठार

- Advertisement -
Andhra-pradesh-13-people-killed-4-injured-in-a-collision-between-a-bus-and-a-truck-near-madarpur
Andhra-pradesh-13-people-killed-4-injured-in-a-collision-between-a-bus-and-a-truck-near-madarpur

करनूलआंध्रप्रदेशातील करनूल  येथे रविवारी एक भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ४ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झाला आहे. चित्तूर जिल्ह्यातून काही नागरिक मिनी बसने हैदराबादच्या दिशेने जात होते त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये एक लहान मुलगा आणि आठ महिलांचा समावेश आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सर्व नागरिक राजस्थानमधील अजमेर येथे जात होते.

- Advertisement -

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी डिवायडरला धडकली त्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला असलेल्या एका ट्रकला जाऊन धडकली. करनूल येथील मादरपूर गावात झालेल्या या अपघातानंतर जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -