Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशयेस बॅंक : अनिल अंबानीही ईडीची फे-यात

येस बॅंक : अनिल अंबानीही ईडीची फे-यात

Anil Ambani Summoned By Enforcement Directorate In Yes Bank Case, anil ambani, yes bank, rana kapoor, enforcement directorate, edनवी दिल्ली : येस बँक घोटाळाप्रकरणी आज रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनाही ईडीने नोटीस पाठविली आहे. अंबानींना राणा कपूर आणि अन्य लोकांनी केलेल्या पैशांच्या अफरातफरीशी संबंधित प्रकरणात चौकशीला बोलविण्यात आले आहे.

आर्थिक अडचणीला कारणीभूत असलेल्या संस्थापक संचालक राणा कपूरला ईडीने आपल्या ताब्यात घेतले आहे. या बँकेद्वारे मोठमोठी कर्जे वाटण्यात आली. ही जवळपास ३० हजार कोटींची कर्ज बुडीत खात्यात गेली असून यामध्ये अनिल अंबानींचेही नाव आहे. राणावर पैशांची अफरातफर केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून ईडीने त्याच्या मुलीलाही ताब्यात घेतले आहे. राणा कपूर गेल्या रविवारपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात असून सोमवार (१६मार्च) कोठडीची मुदत आहे. रिझर्व्ह बॅँकने येस बॅँकेवर निर्बंध आणल्यानंतर ईडीने ६ मार्चला राणा कपूर याच्या वरळीतील समुद्र महल येथील फ्लॅट व कार्यालयावर छापे टाकले होते. त्याच्याकडे जवळपास ३० तासाच्या चौकशीनंतर गेल्या रविवारी पहाटे ईडीने अटक केली आहे. त्यानंतर सीबीआयनेही धाड सत्र घातले. त्यांच्या तीनही मुलींकडे कसून चौकशी सुरु असून देश सोडून न जाण्याबाबत ‘लुक आऊट’ नोटीस जारी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments