Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेश‘कपिल सिब्बल मला माफ करा’ अरविंद केजरीवालांचा आणखी एक माफीनामा

‘कपिल सिब्बल मला माफ करा’ अरविंद केजरीवालांचा आणखी एक माफीनामा

नवी दिल्ली: विक्रम मजिठिया आणि नितीन गडकरींपाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कपिल सिब्बल यांचीही माफी मागितली. या सगळ्यांनी आपल्या विरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे घेण्यासाठी ही माफी मागण्यात आली. कपिल सिब्बल यांना पत्र पाठवून केजरीवाल यांनी त्यांची माफी मागितली आहे. तसेच नितीन गडकरी यांचीही त्यांनी माफी मागितली आहे. हे दोघे केजरीवाल यांच्याविरोधाताला अब्रू नुकसानाचा दावा परत घेण्याची शक्यता आहे.

✔@ANI

Kejriwal Ji & Sisodia ji have accepted that the allegations they had put on me & my son in a press conference few yrs ago were baseless. They’ve apologised for the same today. He has apologised for what he did everything is forgotten now, we will move ahead: Kapil Sibal, Congress

3:44 PM – Mar 19, 2018

माझ्याकडून काहीही पुराव्यांशिवाय तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले. त्यामुळे तुमची बदनामी झाली हे मी जाणतो. त्याचमुळे तुम्ही माझ्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकलात. मी केलेल्या आरोपांबाबत मला खेद वाटतो आहे. मी त्यासाठी तुमची माफी मागतो. माझी विनंती आहे की माझ्या विरोधातला अब्रू नुकसानीचा खटला आपण मागे घ्यावा. अशी विनंती केजरीवाल यांनी दोन्ही नेत्यांना पत्राद्वारे केली आहे.

एवढेच नाही तर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केजरीवाल यांनी केले होते. त्यांचीही नंतर केजरीवाल यांनी माफी मागितली. मजिठिया यांची माफी मागितल्यावर केजरीवाल यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. मात्र अब्रू नुकसानीच्या दाव्यापासून वाचण्यासाठी केजरीवाल यांनी सुरू केलेले माफीनाम्याचे सत्र सुरुच आहे असे दिसून येते आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments