Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशभाजपा सरकार नीरव मोदी घोटाळ्यात सहभागी असल्याचा केजरीवालांचा आरोप

भाजपा सरकार नीरव मोदी घोटाळ्यात सहभागी असल्याचा केजरीवालांचा आरोप

मुंबई: पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) जवळपास ३० हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेला हिरेव्यापारी नीरव मोदीच्या घोटाळ्यात भाजपाच्या केंद्र सरकारचे लोक शामील आहेत. हा घोटाळा सहज झालेला नाही. असा आरोप आम आदमी पार्टीचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलतांना केला.

आधी विजय माल्या ९ हजार कोटी घेऊन पळून जातो. नीरव मोदी ११ हजार कोटी घेऊन विदेशात पळून जातात. हे कसे काय पळून जातात? असाही प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला. नीरव मोदी,विजय माल्या यांना कधी अटक होईल हे भाजपाने सांगितले पाहिजे. २०११ पासून सुरु आहे तर ते घोटाळे आताही सुरु आहे. आधी घोटाळे होत होते म्हणून जनतेने भाजपाला निवडूण दिले. भाजपाचे लोकही घोटाळेच करत आहेत. एकही काँग्रेसचा नेता तुरुंगात गेला नाही. कारण भाजपावालेही घोटाळ्यात पैसे खात आहेत. असा आरोपही केजरीवाल यांनी केला. भाजपा याला कशा प्रकारे उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments