Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशमोदींना 'राष्ट्रपिता' म्हणा-या डोनाल्ड ट्रंम्पवर ओवेसी भडकले

मोदींना ‘राष्ट्रपिता’ म्हणा-या डोनाल्ड ट्रंम्पवर ओवेसी भडकले


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली. ट्रम्प यांनी  पंतप्रधान मोदींना ‘राष्ट्रपिता’ अशी उपाधी दिली. यावर सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली. तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंम्पव तोफ डागली. ट्रम्प आडाणी आणि कमी शिकलेला माणूस आहे. त्यांना महात्मा गांधी आणि भारताबद्दल काही माहिती अशी जोरदार तोफ डागली.

ओवेसी म्हणाले, ‘मोदी कधीच ‘फादर ऑफ नेशन’ होऊ शकत नाहीत. त्यांची आणि गांधीजींची तुलनाच होऊ शकत नाही. ट्रम्प यांना हे माहीत असतं तर त्यांनी अशी जुमलेबाजी केली नसती. महात्मा गांधींनी हा किताब मिळवला होता. लोकांनी त्यांचा त्याग पाहून हा किताब स्वत:हून त्यांना दिला होता. पंडित नेहरू आणि सरदार पटेल हे दोघेही देशातील थोर नेते होते. पण त्यांनाही कधी कुणी ‘राष्ट्रपिता’ म्हणाले नव्हते, असेही ओवेसी म्हणाले.

‘मोदींना कुणीतरी एल्विस प्रेस्ली म्हणाले होतं. त्यात तथ्य असू शकतं. कारण, एल्विस प्रेस्ली उत्तम गायचे आणि गर्दी जमवायचे. आमचे पंतप्रधान सुद्धा चांगलं भाषण देऊन लोकांना गोळा करतात. ही तुलना कुठंतरी मेळ खाते,’ असाही टोला ओवेसी यांनी लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments